पोलिस प्रशासन न्यूज.

करंजाळा शालेय समिती अध्यक्षपदी मा. जगन्नाथ नांद्रे यांची बिनविरोध निवड


सुखापूरी, (रामकिसनअवधूत) ( प्रतिनिधी )

करंजाळा (ता. अंबड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय समितीचा जुना कार्यकाळ संपल्याने नव्या समितीची निवड प्रक्रिया दि. 15/12/2025 रोजी पार पडली. ही निवडणूक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. मांगिलाल पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व सदस्यांच्या सहमतीने शालेय समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीत मा. जगन्नाथ नांद्रे यांची शालेय समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात शाळेच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे व गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे गावातील पालकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकत सर्वानुमते ही निवड केल्याचे मत व्यक्त केले.शालेय समितीच्या उपाध्यक्षपदी श्री. नारायण टेमकर तर सचिवपदी श्री. इंगळे सर यांची निवड करण्यात आली आहे.नवीन शालेय समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. श्री. लहू बाम्हणे, श्री. यशवंत धांडगे, सौ. ज्योती वाघमारे, श्री. किशोर पारदे, सौ. सिमा धुम्मक, श्री. वाल्मीक सुरासे, श्री. नजीर शेख, सौ. सुरेखा भुसारे, गीता नांद्रे, श्री. मारोती आमटे, सौ. राजकन्या नांद्रे .या निवडीनंतर गावातील सर्व ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच माजी सरपंच श्री. विठ्ठल धुम्मक यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेतील सर्व शिक्षकवृंदानेही नवनिर्वाचित समितीचे स्वागत करून पुढील काळात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

                                          नव्या शालेय समितीच्या माध्यमातून करंजाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक, भौतिक व सर्वांगीण विकास अधिक गतीने होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पालकवर्गातून व्यक्त होत आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!