पोलिस प्रशासन न्यूज.

केज रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी असरार कुरेशी तर सचिवपदी हनुमंत भोसले


केज/प्रतिनिधी

 

रोटरी क्लब ऑफ केज च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध व्यावसायिक असरार कुरेशी तर सचिव पदी संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांची निवड करण्यात आली आहे.केज येथील रोटरी क्लब ची स्थापना 2005 साली झालेली असून गेली 20 वर्षापासून क्लब च्या वतीने केजशहरात विविध सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.आजपर्यंत सर्वच अध्यक्षांच्या कार्यकाळात शहरात व परिसरात केज रोटरीच्या वतीने उत्कृष्ट कार्य पार पाडले गेले आहे.रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेत प्रत्येक अध्यक्ष व सचिव यांना 01जुलै ते 30 जून असा फक्त एक वर्षाचा कार्यकाळ निश्चित केलेला आहे.केज रोटरी च्या 2025 – 2026 वर्षा साठी विद्यमान अध्यक्ष सत्यवान राऊत व सचिव प्रवीण देशपांडे हे कार्यरत आहेत.रोटरी क्लब ने 2026 – 2027 या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून केज येथील प्रसिद्ध उद्योजक असरार कुरेशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात केज शहर व परिसरात केज रोटरीचे जास्तीत जास्त कार्य करण्याचा निर्धार भावी अध्यक्ष असरार कुरेशी यांनी व्यक्त केला आहे.या काळात अनेक समाजोपयोगी कार्य करून केज रोटरी चे नांव उंचावू असे ते म्हणाले.या काळात केज रोटरीचे सचिव म्हणून क्लब चे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले हे काम पाहणार आहेत.या निवडीबद्दल अध्यक्ष व सचिव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!