केज/प्रतिनिधी
केज येथील सौदागर ट्रेडिंग कंपनी या आडत दुकानाच्या मालकाने त्यांच्या मुलाकडे दुकानात ठेवायला दिलेले ३४ लाख रुपयाचे धनादेश आडत मालकाची परवानगी न घेता स्वतःच्या बँकेच्या खात्यात जमा करून त्यांची फसवणूक केल्या प्रकरणी हाजी मौला सालम साहेब सौदागर यांच्या फिर्यादीवरून मुनीम शफिक आतिक शेख रा.धारूर याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुरूवार दि.९ जुलै रोजी दुपारी गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,केज येथील समता नगर येथील रहिवाशी हाजीमौला सालम साहेब सौदागर यांचे केजच्या मार्केट यार्ड परिसरात आडतदुकान आहे.त्यांनी दि.१७ जून रोजी सकाळी १० ते दि.२० जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान हाजी मौला सालम साहेब सौदागर यांनी ३४ लाख रुपयाचे धनादेश मुलाकडे देऊन दुकानात ठेवण्या साठी दे म्हणुन मुनीम शफिक आतिक शेख यांच्याकडे दिले होते. परंतु त्याने विश्वासघात करून दुकानात ठेवण्यासाठी दिलेले ३४ लाखाचे धनादेश त्यांच्या मुलाकडे न देता स्वतःच्या बँकेच्या खात्यात ३४ लाख रुपयाची रक्कम जमा करून हाजी मौला सालम साहेब सौदागर यांचा विश्वासघात करून मुलाकडे दुकानात ठेवायला दे म्हणुन दिलेले ३४ लाखाचे धनादेश धनादेश देणाऱ्याची परवानगी न घेता स्वतःच्या बँकेच्या खात्यात जमा करून फसवणूक केली. म्हणुन हाजी मौला सालम साहेब सौदागर यांच्या फिर्यादीवरून मुनीम शफिक आतिक शेख रा.धारूर याच्या विरुद्ध केज पोलिसात गुरूवारी दुपारी गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आसद शेख हे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान या घटनेने परिसरात विश्वास कोणावर ठेवायचा अशी चर्चा होताना दिसत आहे.













