पोलिस प्रशासन न्यूज.

डिझेल,देशीदारू व कार सह ४ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त, सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई


केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील जीवाचीवाडी ते तुकूचीवाडी या रस्त्या वरून सोमवार दि.३० मार्च रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान चार चाकी कार मधून ९० मिलीच्या ३०० देशी दारूच्या बाटल्याचे तीन बॉक्स,१२५ लिटर अवैध डिझेलची वाहतूक करणारी कार मिळून एकूण ४ लाख २२ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल केज पोलीस उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने छापा मारून जप्त करून,आरोपी वाहन चालक अनंत नारायण चौरे रा.जीवाची वाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सोमवारी रात्री उशिरा केज येथून तुकूचीवाडी येथे कार क्रमांक एम एच १२/ केवाय २१४८ मधून देशी दारूच्या बाटल्या व अवैध डिझेलची वाहतूक होत असल्याची माहिती, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांना मिळाल्या वरून त्यांनी त्यांचे पथक पाठवून कारवाईचेआदेश दिले.जीवाचीवाडी ते तुकूचीवाडी या रस्त्यावर सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान जाणाऱ्या कार क्रमांक एम एच १२ / २१४८ ची झडती घेतली असता या कारमध्ये ११ हजार ५०० रुपयाचे १२५ लिटर अवैध डिझेलचा साठा, १० हजार ९५०रुपयाच्या ९० मिलीच्या बॉबी या देशी दारूच्या ३०० बाटल्याचे ३ बॉक्स व कार मिळून एकूण ४ लाख २२ हजार ४५० रुपयाचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला.ही कारवाई केज पोलीस उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम,अमिरोद्दीन इनामदार,जावेद कराडकर,जमादार विकास चोपणे, बालासाहेब डापकर, पोलीस हवालदार राजू गुंजाळ,चंद्रकांत काळकुटे,अनिल मंदे, तांबारे,मुंडे,पोलीस अंमलदार टकले महिला पोलीस जाधव,व भालेराव यांनी केली. याप्रकरणी जमादार बालासाहेब डापकर यांच्या फिर्यादीवरून अनंत नारायण चौरे रा. जीवाचीवाडी याच्या विरुद्ध अवैध डिझेलचा साठा केल्याप्रकरणी व विना परवाना देशी दारूच्या बाटल्यांचा साठा केल्या प्रकरणी केज पोलिसात गून्हा नोंद झाला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली चालु आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!