पोलिस प्रशासन न्यूज.

धारुर येथे वंचित बहुजन आघाडीचा विराट जनआक्रोश मोर्चा,


धारुर (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध जनसमूहांच्या हक्कांसाठी आणि प्रशासनाच्या दुर्लक्ष्याविरोधात विराट जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा आज बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता धारुर येथे मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, यात शेतकरी, कामगार,गायरान धारक,महिला, विद्यार्थी व सर्व समाजाच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष इंजी. प्रशांत उघडे यांनी केले आहे. ‘जनतेच्या न्यायासाठी सर्वांनी एकत्र यावे,’ असे त्यांनी म्हटले आहे.या मोर्चाद्वारे प्रशासनाकडे शेतकऱ्यांचे ५०,००० रुपयांचे अतिवृष्टी अनुदान, गायरान जमिनीचे ७/१२ वाटप, आदिवासी समाजाचे प्रलंबित जात प्रमाणपत्र तसेच श्रम कार्ड आणि पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित हप्ते तातडीने देण्याची मागणी करण्यात येणार आहे.हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाला धाराशिव तालुक्यातील विविध संघटना, बचतगट, विद्यार्थी आणि शेतकरी संघटनांनी मोठा पाठिंबा दर्शविला आहे. तसेच, स्थानिक नेतृत्वात राणबा उजगरे, आकाश गायकवाड, अभिजीत वाव्हळ, कपिल उजगरे, अमोल बनसोडे, नवनाथ गवळी, बाळासाहेब उजगरे आदींचा सक्रिय सहभाग असणार आहे.​वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा प्रशासनाला जागे करणारा ठरणार असल्याचा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मोर्चात जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, महासचिव मिलिंद घाडगे, उप-जिल्हाध्यक्ष सचिन उघडे, युवक जिल्हाध्यक्ष बाबुराव मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!