बीड: आगामी नगरपरिषद (किल्लेधारूर) सार्वजनिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज, बुधवार, १९.११.२०२५ रोजी सकाळी १२:३० वाजता कसबा विभाग, किल्लेधारूर येथील वीर पांडुरंग चौक येथे निवडणूक प्रचार शुभारंभाची व ‘संवाद चळवळीतील तरुणाईशी’ या महत्त्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला धारूर परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुण-तरुणींनी, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सभेसाठी मा. सुजात दादा आंबेडकर (युवा नेते, वंचित बहुजन आघाडी) यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शवली. त्यांनी यावेळी तरुणांशी थेट संवाद साधला आणि शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि चळवळीतील युवाशक्तीची भूमिका यांसारख्या ज्वलंत विषयांवर प्रभावी विचार मांडले. सुजात आंबेडकरांच्या भाषणाने उपस्थित युवा वर्गात एक नवा उत्साह आणि चैतन्य संचारले.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रिंगणात:
याप्रसंगी किल्लेधारूर नगरपरिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांचा परिचयही करून देण्यात आला: आरक्षण उमेदवाराचे नाव:=
प्रभाग १० अ अनुसूचित जाती सर्वसाधारण गायमसुद्रे आकाश गोरखनाथ
प्रभाग १० ब सर्वसाधारण महिला वैरागे. या उमेदवारांसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष,मा.अनिल डोंगरे व युवक जिल्हाध्यक्ष(पुर्व)मा.बाबुराव मस्के यांच्या वतीने करण्यात आले.
या सभेचे आयोजन धारूर तालुकाध्यक्ष, इंजि. प्रशांत उघडे यांनी केले. सुत्रसंचालन धारुर ता.महासचिव.मा. राणबा उजगरे यांनी केले.या प्रचार शुभारंभाने वंचित बहुजन आघाडीने किल्लेधारूर नगरपरिषद निवडणुकीची तयारी जोरदारपणे सुरू केल्याचे दिसून आले. 














