पोलिस प्रशासन न्यूज.

“बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथाचे अंतर्मनातून वाचन करून आचरण करणे गरजेचे – पूज्य भिक्खू धम्मशील थेरो


बीड(प्रतिनिधी): नागसेन बुद्ध विहार, बीड येथे वर्षावास धम्म ग्रंथ वाचन समापन कार्यक्रम उत्साहात संपन्न. तथागतांनी दिलेल्या प्रज्ञा, शील, अष्टांगिक मार्ग, मैत्री, करुणा आणि दान पारमिता या बहुमोल उपदेशाचे आचरण मानवी कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी केले. नागसेन बुद्ध विहार, धानोरा रोड, बीड येथे झालेल्या वर्षावास धम्म ग्रंथ वाचन समापन कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मेहनतीने तथागतांचा उपदेश सामान्य जनतेला समजावा म्हणून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाद्वारे लिखित स्वरूपात आणला. हा ग्रंथ केवळ वाचायचा नाही, तर त्याचे अंतर्मनातून वाचन करून तसे आचरण जीवनात करणे किती महत्त्वाचे आहे, हे पूज्य भिक्खू धम्मशील थेरो यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मधुर वाणीतून अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले.                                ​                          कार्यक्रमाची सुरुवात : कार्यक्रमाची सुरुवात पूज्य भिक्खू धम्मशील थेरो आणि भिक्खू धम्मबोधी शिवनी यांची कृषी कॉलनी ते नागसेन बुद्ध विहार अशी सवाद्य रॅली काढून करण्यात आली. विहारात आगमन झाल्यावर पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. आदर्श पूजन करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विहार कमिटीतर्फे महिला उपासिकांनी पुष्पगुच्छ देऊन पूज्य भंतेचे त्रिवार वंदन करून स्वागत केले. मार्गदर्शन आणि मनोगत : बौद्धाचार्य ज्ञानोबा पोटभरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले, तर से. नी. वरिष्ठ शाखा प्रबंधक एल.आय.सी., बीडचे आयु. यु एस वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. श्री परमेश्वर बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचे महत्त्व विशद केले.पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांनी आपल्या धम्मदेशनेत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुमोल उपदेशांचा सखोल विचार करून प्रत्येक रविवारी कुटुंबासह विहारात यावे. मनाला सुख, शांती आणि समाधान देणाऱ्या धम्माचे तत्त्व अंगिकारून जीवन समृद्ध करावे आणि बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणारी चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी योगदान द्यावे. आभार आणि सांगता :केशरताई त्रिंबकराव कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला परिसरातील आणि शहरातील बहुसंख्य उपासक, उपासिका, बालक-बालिकांची उपस्थिती होती. शेवटी सरणत्तयने आणि भोजन दानाने कार्यक्रमाची सांगता झाली


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!