पोलिस प्रशासन न्यूज.

बीड शहरात गुन्हेगारीला ऊत्तर – व्यवसाय रात्री 10 नंतर बंद ठेवावेत, संवेदनशील ठिकाणी पोलीस चौक्या उभाराव्यात!


बीड – (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. किरकोळ कारणावरून वादविवाद मारामारी आणि थेट खूनापर्यंत पोहोचत आहेत. तरुणांमध्ये कायद्याचा धाक पूर्णपणे संपला असून, शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गुंडगिरी, टोळकेबाजी आणि दहशतीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत.शहरातील चौकाचौकात, पानटपरी, शाळा–महाविद्यालयीन परिसरात तरुण मुलं तीक्ष्ण हत्यारे घेऊन उभी राहत असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानसहान कारणांवरून घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे बीडकरांचा जीव धोक्यात आला आहे.या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीड शहरातील सर्व व्यवसाय रात्री 10 नंतर बंद ठेवण्याचे कठोर आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच पालवण चौक, तुळजाई चौक, माने कॉम्प्लॅक्स आणि कॉफी सेंटर स्टेडियम परिसर हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचे कायमस्वरूपी अड्डे बनले आहेत. त्यामुळे तातडीने या ठिकाणी पोलीस चौक्या उभाराव्यात, असा ठाम आग्रह व्यक्त करण्यात आला आहे.               पोलीस खात्यातील राजकीय हस्तक्षेपामुळे तरुणांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही, अशी गंभीर टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी निष्क्रीय राहण्याऐवजी कठोर पावले उचलून गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश लावला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यासह जिल्हा महासचिव खंडू देवराव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर, सामाजिक कार्यकर्ते नितीन जायभाये, तांदळे सर, संघटक अर्जुन जंवजाळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष रोहन मगर, तालुका अध्यक्ष किरण वाघमारे, उमेश तुळवे, मिलिंद सरपते, संदीप जाधव यांनी एकमुखाने ही मागणी केली आहे.


58
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!