बीड: बीड नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यावेळी प्रमुख पक्षांमध्ये कडवी पंचरंगी लढत पाहायला मिळत आहे. अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीचे गॅससिलेंडर, राष्ट्रवादीचे घड्याळ, शरद पवार गटाची तुतारी आणि एमआयएमचा पतंग या प्रमुख चिन्हांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे.भाजप ने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही लढत अत्यंत लक्षवेधी ठरली आहे.
निवडणूक आणि आरक्षण:
यंदा २६ प्रभागातून ५२ नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने सर्वच पक्षांना योग्य उमेदवाराच्या शोधासाठी कसरत करावी लागली.
📊 बीडचे जातीय समीकरण आणि मतांचे ध्रुवीकरण
बीड नगरपालिकेत एकूण १ लाख ८० हजार मतदार आहेत. जातीय समीकरणाचा विचार केल्यास, मुस्लिम मतांची संख्या सर्वाधिक आहे, ज्यामुळे अनेक पक्षांचा कल या मतदारांना आपल्याकडे वळवण्याकडे आहे.समाज मतदारांची अंदाजित संख्या
मुस्लिम ६३,००० (सर्वाधिक)
मायक्रो ओबीसी (उदा. वंजारी, माळी, धनगर, बंजारा) ६०,०००
दलित (उदा. महार, मांग, चांभार, ढोर) २७,०००
मराठा १५,०००
जैन, मारवाडी, ब्राह्मण १४,०००. “प्रमुख उमेदवारांची रणनीती” १. वंचित बहुजन आघाडी – सारिका विकास जोगदंड. समुदाय: दलित समाजातील (महार)
रणनीती: हा पक्ष दलित ,ओबीसी आणि मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे म्हणणे आहे की इतर पक्षांचे उमेदवार केवळ आरक्षणाचा लाभ घेणारे आहेत, त्यांना दलितांच्या मूळ प्रश्नांची देणघेण नाही. २. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट – तुतारी) – समिता विष्णू वाघमारे. समुदाय: दलित समाजातील (महार).
रणनीती: आमदार संदीप शिरसागर यांच्या नेतृत्वाखालील या गटाने ६३ हजार मुस्लिम मतदारांवर लक्ष ठेवत, नगरसेवक पदासाठी तब्बल २२ मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे, जी इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
फोकस: मुस्लिम आणि मराठा मतदारांकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत, सोबतच त्या अनुसूचित जातीच्या “ओरिजिनल” उमेदवार असल्याचे सांगून दलित मतदारांना साद घालत आहेत.
३. भाजप (कमळ) – डॉ. ज्योती घुमरे
समुदाय: अनुसूचित जातीतील (चांभार).
रणनीती: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राजकारणापलीकडे जाऊन एका सुशिक्षित महिलेला उमेदवारी दिली आहे. डॉ. ज्योती घुमरे या स्वतः भूलतज्ज्ञ असून त्यांचे पती सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ आहेत.
फोकस: भाजपचा भर थेट हिंदू आणि दलित मतदारांवर आहे. मराठा, जैन, मारवाडी, ब्राह्मण, ओबीसी, मायक्रो ओबीसी आणि दलित असे मिळून १ लाख १७ हजार मतदारांवर त्यांचे लक्ष आहे. मुस्लिम मतांकडे दुर्लक्ष करत, उच्चशिक्षित आणि स्वच्छ चेहरा म्हणून मतदारांमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णय आहे.
४. राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) – प्रेमलता पारवे
समुदाय: अनुसूचित जाती.
रणनीती: प्रेमलता पारवे यांचे जावई मुजीब शेख हे मुस्लिम आहेत. मुजीब शेख यांनी संपूर्ण मुस्लिम समुदायाला “मीच उमेदवार आहे” असे समजून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
फोकस: मुस्लिम मतांवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तसेच मराठा, दलित, मारवाडी, ब्राह्मण या समुदायातील १ लाख २० हजार मतदारांवर त्यांचे लक्ष आहे.
५. एमआयएम (पतंग) – सुरेखा हर्ष शृंगारे
समुदाय: जन्माने दलित, परंतु त्यांचे पती वाजेद शेख इनामदार मुस्लिम असल्याने त्या थेट मुस्लिम म्हणून गणल्या जातात.
फोकस: त्या थेट ६३ हजार मुस्लिम मतदारांवर अवलंबून आहेत.
अखेरीस, वंचित बहुजन आघाडी या पक्षाची मदार ओबीसी,दलित,मुस्लिम. मतांवर आहे.राष्ट्रवादीची घड्याळ, तुतारी आणि एमआयएमचा पतंग या तीन पक्षांची मदार मुस्लिम मतांवर आहे, तर भाजपवाल्यांना हिंदू मतांची अपेक्षा आहे. त्यामुळे बीडकर नेमकी कोणाला साथ देतात, हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल.













