केज/प्रतिनिधी: बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक दि.८ जानेवारी गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता बीड येथे होणार आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव तथा मराठवाडा सहप्रभारी श्रीमती रेहाना चिस्ती यांच्या मार्गदर्शना खाली ही बैठक महिला महाविद्यालयात संपन्न होत असून या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा पिंपरी चिंचवड निवडणुकीचे प्रभारी श्री. आदित्य दादा पाटील व बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. राहुल भैया सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत.या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालया समोर मनरेगा बाबत केंद्र सरकारने पारित केलेल्या चुकीच्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहेया बैठकीस सर्व आजी माजी,पदाधिकारी, लोकप्रतिनिधिंनी उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रवीणकुमार शेप यांनी केले आहे.













