पोलिस प्रशासन न्यूज.

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने २६ व २७ मे रोजी उंदरी येथे खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम ;


केज/प्रतिनिधी

कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या अकराव्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांच्या नांवे असलेल्या स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने मंगळवार,दिनांक २६ व बुधवार,दिनांक २७ मे २०२६ रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे विविध उपक्रम तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोबतच खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम ही होणार आहे.या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे-पाटील आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.येथील कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थी प्रिय दिवंगत सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे -पाटील यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार,दिनांक २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांना उंदरी ता.केज येथे खरीप पिक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.अशोक थोरात (संचालक,महाराष्ट्र राज्य कामगार विमासोसायटी, मुंबई.)आणि उ‌द्घाटक म्हणून डॉ.नरेंद्र काळे (अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य दंत परिषद तथा सचिव, बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा.) हे असणार आहेत.यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ.सय्यद रफिक पारनेरकर(संतसाहित्याचे गाढे अभ्यासक तथा सचिव,सद्भावना मंच, महाराष्ट्र.),वृक्षमित्र सुधाकर देशमुख (महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त.),डॉ.वसंत सुर्यवंशी (विस्तार कृषि विद्यावेत्ता,विकृविशिकें, लातूर.) यांचे मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच बुधवार, दिनांक २७ मे रोजी सकाळी ठिक ९.३१ ते ९.४० या वेळेत वृक्ष पुजन व संवर्धन करण्यात येवून सकाळी १० वाजता नियोजित कार्यक्रमास सुरूवात होईल.उंदरी ता.केज येथील कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे -पाटील स्मृती भवन येथे अकराव्या पुण्यस्मरणा निमित्त पुरस्कार वितरण व शेतकरीमेळावा देखिल आयोजित करण्यात आला आहे.या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन डॉ.अशोक ढवण (माजी कुलगुरू,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी.) यांच्या हस्ते होईल.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.वेदप्रकाश पाटील (माजी कुलगुरू, मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी) हे असणार आहेत.तर यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर मुंदडा (नगराध्यक्ष,नगरपरिषद, अंबाजोगाई.),रमेशराव आडसकर (चेअरमन, अंबाजोगाई सहकारी साखरकारखाना.लि. अंबाजोगाई.),पृथ्वीराज साठे (माजी आमदार, केज विधानसभा मतदार संघ संघ.),डॉ.उदय खोडके (माजी संचालक शिक्षण,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी.),अॕड.राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.),बीड.), राहुल सोनवणे (जिल्हाध्यक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,बीड) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या ६ मान्यवरांना कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील स्मृती पुरस्कार तर अन्य २ जणांना अनुक्रमे स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे-पाटील व स्व.सौ.राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. एकूण ८ पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा समावेश आहे.त्यातील शिवाजीराव परबतराव जाधव(मु.पो.चिकल ठाणा,ता.जि.लातूर) यांना विक्रमी ऊस उत्पादन व शेतकरी स्वावलंबन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुशल कारभारी किसान पुरस्कार-२०२६, डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील (मु.पो.बोरगाव (धनेश्वरी),ता.कळंब, जि.धाराशिव) यांना बंधुत्व,माता-पिता सेवा, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती आदर्श बंधू भरत व भक्त पुंडलिक पुरस्कार-२०२६,सौ. संगीता शरद झरे (मु.पो.बुधोडा,ता.औसा, जि.लातूर) यांना सामाजिक,सेंद्रिय शेती, महिला,अनाथ-पिडीतांची सेवा व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार-२०२६, अरूण माधवराव समुद्रे (मु.पो.ता.जि.लातूर.) यांना पत्रकारिता, आकाशवाणी,दूरदर्शन, शिक्षण व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती पत्रकारिता पुरस्कार-२०२६,श्रीमती लक्ष्मीबाई प्रभाकर कराड (मु.पो.सायगाव, ता.रेणापूर, जि.लातूर.) यांना नैसर्गिक शेती,वृक्ष संवर्धन,महिला जागृती आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी स्व.सौ.राणी लक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुशल कारभारीन किसान पुरस्कार-२०२६, डॉ.छगन जयसिंग राठोड (मु.पो.वासली,ता.पातूर, जि.अकोला) यांना सेंद्रिय शेती,महिला सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती कृषिउद्योग भूषण पुरस्कार-२०२६, डॉ.सय्यद रफिक पारनेरकर मु.पो.ता. पारनेर,जि.अहिल्यानगर.

यांना वारकरी सांप्रदायिक प्रबोधन, साहित्य निर्मिती, वैद्यकीय सेवा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती सद्भावनापुरस्कार-२०२६ आणि डॉ.बालासाहेब संभाजीराव सोनवणे‌ (मु.पो.उंदरी,ता.केज, जि.बीड.)यांना आरोग्य सेवा,पर्यावरण व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती उंदरी ग्रामभूषणपुरस्कार- २०२६ हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. २६ व २७ मे २०२६ या दोन्ही दिवशी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाण च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांसाठी केज, अंबाजोगाई,धारूर, माजलगाव तालुका आणि लातूर,परभणी, धाराशिव,अकोला, अहिल्यानगर तसेच बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे-पाटील आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या वतीने करण्यात येतआहे.याकार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उंदरी (ता.केज) येथील समस्त गांवकरी,माजी कृषी विद्यार्थी संघ व मित्र परिवार,वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ,परभणी आदिंनी पुढाकार घेतला आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!