केज | प्रतिनिधी
सांस्कृतिक कला विश्व समिती, केजच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून विविध पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गुणवंत कलावंतांचा भव्य सत्कार सोहळा दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी उत्सव फंक्शन हॉल, केज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वरांजली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, गणेश गिरी, ज्येष्ठ समाजसेवक हनुमंत भोसले सर, ज्येष्ठ पत्रकार डी. डी. बनसोडे सर, अशोक सोनवणे, रणजीत घाडगे, मुबशीर खतीब, तात्या गवळी, प्रदीप गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांस्कृतिक कला विश्व समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांचा गौरव हा इतर कलाकारांसाठीही प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
🏆 या पुरस्कारार्थींचा झाला गौरव
गौतमजी खंडागळे सर (मुंबई) यांना तब्बल ५१ विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. तसेच प्रा. रमेश सरवदे सर हे शासकीय व राज्यस्तरीय असे एकूण ४१ पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
याशिवाय अस्मिता सुरवसे, रतन सवयी, शकुंतला ससाने, ललिता लांडगे आणि निशा उजगरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
🎶 गायन मैफिलीने रंगली संध्याकाळ
सत्कार सोहळ्यानंतर पुरस्कारार्थी कलावंतांनी सादर केलेल्या सुरेल गीतांच्या मैफिलीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कलावंतांच्या सुंदर गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल वैरागे, मुनीर कुरेशी, उमाकांत बोधने, बलभीम मस्के, सुनिता बोधने, अनिता मुंडे, विमल अंकुशे यांच्यासह सांस्कृतिक कला विश्व समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
— लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज
सत्याचा आवाज, जनतेची ताकद











