अहमदनगर प्रतिनिधी – सुनिल वाघमारे
श्रीरामपूर, दि. १ सप्टेंबर : वंचित बहुजन युवाआघाडीच्या श्रीरामपूर तालुका कार्यकारिणीचे संघटन अधिक बळकट करण्यासह पक्षाच्या विविध उपक्रमांचा व कार्याचा आढावा घेण्यासाठी बेलापूर (राजवाडा) येथील सागरबंगला येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष मा. राजेंद्र पातोडे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण उत्तर अहमदनगर जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची प्रक्रिया जिल्हाध्यक्ष व जिल्हा महासचिव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कार्यआढावा घेऊन आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मा. सागरभाऊ खरात यांनी केले होते.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष मा. प्रविणभाऊ आल्हाट म्हणाले की, “सध्याच्या काळात अठरापगड जाती-जमातीतील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांचा ठामपणे कैवार घेणारे नेतृत्व म्हणजे श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर. प्रत्येक जाती-धर्मातील जनसामान्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संघटित होणे ही काळाची गरज आहे.”
प्रत्येक गावात तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाच्या शाखांची सक्षम बांधणी करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यांशी सातत्याने संपर्क ठेवून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा महासचिव मा. सुनिलभाऊ वाघमारे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “प्रत्येक तरुण तसेच माता-भगिनींनी श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीशी सक्रियपणे जोडले जाणे आणि पक्षाचे ऑनलाइन सदस्यत्व घेणे अत्यंत गरजेचे आहे.” समाजातील सर्व घटकांना न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची विचारधारा तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवानेते मा. सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १९ सप्टेंबर रोजी हरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ख्रिस्ती हक्क परिषद व महासभेस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने व ताकदीने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेसोबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात पक्ष संघटन अधिक व्यापक व सक्षम करण्यासाठी गावागावात आणि वॉर्डनिहाय शाखा बांधणी, सदस्य नोंदणी तसेच जनसंपर्क अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मा. सागरभाऊ खरात यांनी केले, तर आभारप्रदर्शन कैलास त्रिभुवन यांनी केले.
यावेळी विलास अहिरे, राहुल ठोंबरे, अविनाश गोरे, श्लोक तेलोरे, विवेक रोहम, आयुष तेलोरे, तन्वीर सय्यद, अय्युब शेख, मोहसीन खान, असिर पठाण, कानिफनाथ जाधव, रमेश भोसले, सनी खरात, चेतन सोनवणे, आकाश सोनवणे, किशोर पठारे, आलीन शेख, आशिष खरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..










