पोलिस प्रशासन न्यूज.

सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारणारी निर्भीड पिढी घडतेय; देशभर परिवर्तनाचे आशादायी चित्र — दिपक डोके, वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य


जालना : (प्रतिनिधी) परतुर तालुक्यातील वाटूर येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोपीय कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक डोके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी बाळासाहेब आचळे भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा संस्कार सचिव,बाळासाहेब अंभोरे माजी सभापती, पंचायत समिती परतुर, पळसखेड सरपंच राजु प्रधान, दिलीप मगर आदी सह मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री डोके यांनी सांगितले की,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा आणि अॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे लढण्याचे बळ यामुळे प्रश्न विचारणारी, संविधानिक मूल्यांसाठी संघर्ष करणारी आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणारी तरुणाई तयार होत आहे. हीच जागरूक पिढी भविष्यात लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास श्री .डोके यांनी व्यक्त केला.

“सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारण्यासाठी मागे-पुढे न पाहणारी पिढी घडत आहे. ही प्रक्रिया देशातील परिवर्तनाचे आशादायी चित्र निर्माण करणारी आहे,” असे दिपक डोके यांनी सांगितले.भारतीय बौद्ध महासभेचे ठाणे जिल्हा संस्कार सचिव बाळासाहेब आचळे यांनी नियमित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केले कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रतापराव मोरे ,उत्तमराव मोरे ,बाबुराव आचळे ,किसन खाडे ,अमोल मोरे ,भीमराव मोरे ,भगवानराव मोरे,कुंडलिकराव उघडे,भगवान खरात, विलास मोरे, राजू शेजुळ,लहू मोरे,राहुल मोरे, मुकेश मोरे, नितीन शिंदे, उमेश उघडे, सिध्दार्थ मगर,भास्कर आचळे यांनी परीश्रम घेतले.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!