पोलिस प्रशासन न्यूज.

कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती सुरू करा महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 1३ ऑगस्ट रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन- शेख नसीर


बीड प्रतिनीधी: महाराष्ट्र कामगार मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा शासनाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या हेतू बीड जिल्हा महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी गुरुवार बीड जिल्हा अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार आहे तरी विविध कामगार संघटनांनी व कामगार पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष शेख नसीर भाई यांनी केले

पुढे बोलताना शेख नसीर यांनी म्हटले विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्यात यावी.

कामगारांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे हजारो कामगार कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शासनाने शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून पहिली ते दहावीच्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती पूर्वीप्रमाणे सुरू करावी, अशी मागणी साठी दिनांक 13 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनात सर्व कामगार संघटना कामगार प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान बीड जिल्हा महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शेख नसीर भाई यांनी केले


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!