पोलिस प्रशासन न्यूज.

तांबडे वस्ती येथील राधाकृष्ण बालकाश्रमात सम्यक तुपारेचा वाढदिवस उत्साहात संपन्न, बालकांना अन्नदान व शैक्षणिक साहित्याचे वाटप


केज/प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील

तांबडे वस्ती,शिरूर घाट येथे विद्यार्थी सम्यक भरत तुपारे याचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या आणि स्तुत्य पद्धतीने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सम्यक ची आई व आजी यांनी त्याचे औक्षण करून त्याला दीर्घायुष्य,सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले.त्यानंतर आई- वडिलांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.या प्रसंगी सामाजिक भान जपत राधाकृष्ण बालकाश्रमा तील सर्व मुलांना जेवण देण्यात आले. तसेच बालकाश्रमातील मुलांच्या शिक्षणाला हातभार म्हणून त्यांना वह्या व पेन यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे बालकाश्रमातील सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन बालकाश्रमाचे अधीक्षक सुनील अशोकराव कुलकर्णी आणि राधाकिसन दराडे यांनी केले.तसेच बी.एस.गायकवाड (सहशिक्षक) व अधीक्षकांनी मिळून सम्यकचे वडील भरत तुपारे यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार केला.सर्व उपस्थितांच्या सहकार्याने आणि उत्साही वातावरणात हा वाढदिवसाचा सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!