रामकिसन अवधूत अंबड (प्रतिनिधी )
अंबड तालुक्यातील ग्रामीण पत्रकारांचे संघटित प्रयत्न आज एक नवा आयाम घेऊन समोर आले आहेत. वडीगोद्री येथे आयोजित झालेल्या बैठकीत तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. संघाचे अध्यक्षपद अनंत मुंडे यांना, उपाध्यक्षपदी मोहन रोटे यांना आणि सचिवपदी पवन पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी अन्य पदांवरही गावोगावी परिचित असलेल्या पत्रकारांची निवड झाली. या निवडी बद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठकीचे आयोजन स्थानिक पत्रकारांद्वारे केले होते आणि तेथे अनेक ग्रामीण पत्रकार, उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतप्रमुखाच्या उपस्थितीत करण्यात आली, त्यानंतर संघटनेच्या कार्याची रूपरेषा आणि पुढील उपक्रम यावर सविस्तर चर्चा झाली आहे.
या कार्यकारणीत दिलीपराव पवार,दिलीपराव दखने, रविंद्र घाडगे, रोहिदास पवार, राजेंद्र छल्लारे,सुरेश काळे, राजेंद्र पवार,किर्तीनंद गांगुर्डे, पांडुरंग सोळुंके,चक्रधर नाटकर, रमेश सुरवसे,फकीर मोहम्मद बागवान, शैलेश मरकड, प्रवीण काळे,अशोक चांगले,अशोक गायकवाड, बंडू शिंगटे, मुकेश डूचे,सुदर्शन गावडे,कृष्णा आगलावे, रजनीश कणके, कैलास खरात रामकिसन अवधूत आदी चा समावेश आहे
.













