पोलिस प्रशासन न्यूज.

लखमापुरी जि. प. शाळेस वर्षभर मोफत पिण्याच्या पाण्याची सोय; किशोर कांबळे यांचा सामाजिक उपक्रम


सुखापूरी ( प्रतिनिधी.रामकिसन अवधुत) अंबड तालुक्यातील लखमापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वर्षभरासाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील किशोर कांबळे यांनी स्वखर्चातून हा उपक्रम राबवला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून, उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना थंड पाणी मिळावे यासाठी त्यांनी शाळेसाठी पाण्याची सोय केली. विद्यार्थ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती पाहून, किशोर कांबळे यांनी वर्षभर दररोज तीन पाण्याचे जार शाळेस देण्याचा संकल्प केला आहे.

आज सकाळी 9.00 वाजता शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेस तीन पाण्याचे जार सुपूर्द करण्यात आले. शाळेच्या वतीने किशोर कांबळे यांचे स्वागत करून आभार मानण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, संपूर्ण गावात त्यांच्या कार्याची चर्चा आहे.

या कार्यक्रमाला गावातील ज्ञानेश्वर तारगे, मच्छिंद्र काळे, सुखदेव कासार, विक्रम तांदळे, प्रतिप भापकर, अतुल गाडे, रवि कांबळे, चंद्रकांत अवधूत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटपही करण्यात आले.

किशोर कांबळे यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!