पोलिस प्रशासन न्यूज.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात युसुफ वडगाव मंडळातील मौजे सुकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा-1 संपन्न


केज.प्रतिनिधी:  केज तालुक्यातील युसुफवडगाव मंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा-1 कळंब-अंबाजोगाई रोड वरील सुकळी (गोटेगाव) येथील निसर्गराजा मंगल कार्यालय येथे दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले. सदरील शिबीरास युसुफवडगाव मंडळातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीरास मा.दीपक वजाळे साहेब उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई, मा.अशोक भंडारे साहेब नायब तहसीलदार केज यांचे मार्गदर्शन लाभले. नागरिकांना एकाच दिवसात सेवा पुरविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. श्री.विकास हजारे साहेब मंडळ अधिकारी युसुफवडगाव व युसुफ वडगाव मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले या विशेष शिबिरात शेकडो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध दाखले व शासकीय सेवांचा लाभ घेतला.


72
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!