पोलिस प्रशासन न्यूज.

घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा न झाल्यास वंचित कडून आंदोलन छेडणार- दिपक डोके


रामकिसन अवधूत (प्रतिनिधी) जालना : प्रधान मंत्री घरकुल, रमाई घरकुल व विविध घरकुल योजनेतुन घरकुल मंजूर होऊनही विविध तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या हप्त्यांच्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना पंचायत समितीचे अधिक्षक श्री. कपे यांची भेट घेत विविध घरकुल योजनेतुन मंजूर प्रलंबित असलेल्या घरकुल हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सेवली सर्कल साठी गृहनिर्माण अभियंता नेमणूक तात्काळ करण्यात यावी या बाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे तसेच जालना तालुक्यातील नेर मौजपुरी हिवरा रोषणगांव पिरकल्याण देव मुर्ती भाटेपुरी रेवगांव वाघ्रुळ सर्कलचे गृहनिर्माण अभियंता यांना श्री.कपे यांनी संपर्क साधला व पाठपुरावा केला आहे परंतु तरीही संबंधित लाभार्थी यांचे रखडलेले हप्ते तात्काळ जमा न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे व निदर्शने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी दिला आहे . याप्रसंगी तालुकाध्यक्ष भानुदास साळवे ,ज्ञानेश्वर बोबडे, शत्रूज्ञ कोळी ,प्रमेश्वर बेढे ,संजय आदमाने भगवान आदमाने, सतीश सूर्यनारायण,दत्ता आदमाने, कपिल सूर्यनारायण, धनराज गिरी यांच्या सह लाभार्थी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!