पोलिस प्रशासन न्यूज.

मुक्त पत्रकार डी.जी. वानखेडे यांना पत्रकार संघाचा मूकनायक पुरस्कार जाहीर..!


31 जानेवारी रोजी मूकनायक दिनी जाहीर कार्यक्रमात होणार वितरण..!!

बीड प्रतिनिधी

सेवानिवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ तथा ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचा मूकनायक 2026 हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मूकनायक दिन समारंभामध्ये सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने बीड येथील ज्येष्ठ मुक्त पत्रकार डी. जी. वानखेडे यांचे अविरत जनहितार्थ सुरू असलेले सेवा कार्य लक्षात घेऊन त्यांना 31 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मूकनायक दिन समारंभ कार्यक्रमांमध्ये सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सीईओ पी व्ही बनसोडे लाभणार असून अनेक मान्यवर संपादक, पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा गुणगौरव सोहळा तुलसी संगणक कॉलेज सभागृह, आदर्श नगर, डीपी रोड बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार सोहळ्याला भारतरत्न,घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, दलित, वंचित घटकांचा आवाज म्हणून सुरू केलेल्या पहिल्या मूकनायक वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आंबेडकर प्रेमी विचारधारेची मंडळी आणि समाजसेवेची जाणीव असलेल्या तमाम नागरिक महिलांनी या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून मूकनायक दिन समारंभ सोहळा नेत्रदीपक करावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!