पोलिस प्रशासन न्यूज.

बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान संपन्न,आजचा विद्यार्थी उद्याचा सक्षम मतदार व नागरिक असतो – तहसीलदार राकेश गिड्डे


केज/प्रतिनिधी:

भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली मतदार नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे.लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थी मतदार हा महत्त्वाचा घटक असुन तो उद्याचा तो सक्षम नागरिक व मतदार असतो असे प्रतिपादन केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले.ते केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते.तहसीलदार गिड्डे पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शिस्त व नियमित अभ्यास करुन यश संपादन करावे. सातत्य हाच प्रगतीचा मार्ग आहे.त्याच बरोबर

आपल्या लोकशाहीला अजुन बळकट करण्या साठी सर्वच विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी असे ही सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.माधवराव फावडे हे होते.या कार्यक्रमात व्यासपीठावर अजित ढोपे

नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी केज सहाय्यक महसुल अधिकारी रोडगे मॅडम, प्राचार्य डॉ.माधवराव फावडे,वसंत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश धेंडे,उपप्राचार्य हेमंत देशमुख उपस्थित होते.प्रमुख अतिथींचे स्वागत अनुक्रमे प्राचार्य डॉ.फावडे,प्रकाश धेंडे, हेमंत देशमुख,डॉ.सौ. रतन गंगणे,डॉ.टी.एस. बिडवे यांनी केले.

याकार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जे.बी.यादव यांनी सुत्र संचालन डॉ.बी.जे.हिरवे तर आभार डॉ.एस.एम. सरसरे यांनी केले.आभार प्रदर्शनापुर्वी राष्ट्रीय मतदारदिनाच्या निमित्ताने मतदारांच्या शपथेचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्विते साठी डॉ.सी.बी.इंगळे, डॉ.एस.के.शिंदे,डॉ.एम. एस.कांबळे,डॉ.एम.एस.माने,डॉ.टी.एस.बिडवे, रासेयो कार्यक्रमअधिकारी डॉ.जे.बी.यादव,डॉ.एस. एम.सरसरे,डॉ.सौ.आशा बोबडे,डॉ.सौ.रतन गंगणे, डॉ.बी.एस.थोरात,डॉ. अनिल किर्दंत,डॉ.प्रशांत क्षीरसागर,डॉ.एस.एस. जाधव,डॉ.सुधीर आगळे, डॉ.काळम,डॉ.काकडे,डॉ. अशोक भोसले,डॉ. संदिपान गायके,प्रा.समुद्रे, प्रा.शेटे,प्रा.लोंढे,प्रा.रोडे, डॉ.प्रकाशखुळे,डॉ.अनिल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!