विना ऑपरेशन, विना औषध सांधेदुखी आणि मणक्याच्या आजारांवर मिळणार उपचार; चंद्रपाल मस्के यांचे आवाहन
केज (प्रतिनिधी):
आजच्या धावपळीच्या जीवनात मानदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखी यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर, नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर केज शहरात पहिल्यांदाच भव्य ‘मोफत कायरोप्रॅक्टिक महाशिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित केले असून, नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक चंद्रपाल मस्के यांनी केले आहे.
विना शस्त्रक्रिया उपचाराची संधी
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे विना ऑपरेशन, विना इंजेक्शन आणि विना औषध उपचार केले जाणार आहेत. ज्या रुग्णांना मणक्याच्या किंवा गुडघ्याच्या आजारासाठी शस्त्रक्रियेचा (Operation) सल्ला देण्यात आला आहे, अशा रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखी यांपासून आराम मिळवून देण्यासाठी तज्ज्ञांमार्फत तपासणी व उपचार केले जातील.
शिबिराचा तपशील:
दिनांक: गुरुवार, १ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत
स्थळ: कायरोवेदा स्पाइन एलाइनमेंट अँड वेलनेस सेंटर, लोंढे कॉम्प्लेक्स, त्रिमूर्ती हिरो शोरूमजवळ, सिल्वर जिम शेजारी, अक्सा कॉलनी, गल्ली नं ५, बीड रोड, केज.
नाव नोंदणी आवश्यक
शिबिरात गर्दी टाळण्यासाठी आणि प्रत्येकाला योग्य वेळ मिळावा यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक नागरिकांनी आपले नाव नोंदवण्यासाठी चंद्रपाल मस्के यांच्या ९६७३९४११५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.














