परळी: भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा नाथरा, तालुका परळी यांच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता बोधीसत्त्व धम्मज्ञान परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला, ज्याचे अध्यक्षस्थान डॉ. स्वप्निल भैय्या महाळंगीकर (जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष तथा डिव्हिजन ऑफिसर, समता सैनिक दल) यांनी भूषविले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये
आद.यशपाल बचाटे(तालुका सरचिटणीस तथा डिव्हिजन ऑफिसर, समता सैनिक दल), तालुका संरक्षण सचिव आद. जयपाल भय्या पंचांगे आणि ग्राम शाखा अध्यक्ष आद. विमल ताई शिंदे उपस्थित होत्या.मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका, बालक आणि बालिका यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सरणंतय’ घेऊन समारंभाची सांगता झाली.













