पोलिस प्रशासन न्यूज.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ३२वा नामविस्तार दिन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरा


जालना: शहरातील अंबड चौफुली येथील वंचित बहुजन आघाडी विभागीय जनसंपर्क कार्यालय येथे ३२ वा डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठावडा नामविस्तार दिना निमित्त नामांतर शहीदांना अभीवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण,पंचशील ग्रहण करण्यात आले व नामविस्तारातील शहीद भीम सैनिकांना विनम्र अभिवादन करून ३२ वा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात,महिला जिल्हाअध्यक्षा रमाताई होर्शिळ, सम्यक विध्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने, संजय आदमाने,कामगार आघाडी शहराध्यक्ष राज आदमाने,सत्यपाल गायकवाड,मैनाताई खंडागळे, मायाताई वानखेडे, दिलीप मगर,ता उपाध्यक्ष विलास नरवडे, गौतम पाडमुख,राजु अचलखांब सुरेश आदमाने यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!