पोलिस प्रशासन न्यूज.

घुंगर्डे हादगाव मत्स्येदरी विद्यालयात इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.विद्यार्थ्यांनी कधीही स्वतःला कमी समजू नये- बाबासाहेब गोंटे


घुंगर्डे हादगाव मत्स्येदरी विद्यालयात इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

प्रतिनिधी :

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील मत्सयोदरी विद्यालयात इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांना इयत्ता नववीचे विद्यार्थ्याकडून नुकताच निरोप देण्यात आला या प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब गोंटे सर होते. कार्यक्रमात बोलताना गोंटे सर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी कधीही स्वतःला कमी समजू नये. प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर विकास साधता येतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो हे दूध पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणून पुढे चालत राहावे असे गोंटे सर यांनी सांगितले. पुढे बोलताना गोंटे सर म्हणाले की, शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना कुठल्याही प्रकारचा गैरवापर न करता भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी . तसेच कठोर परिश्रम घेतले पाहिजे . विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर ज्ञानाचे धडे गिरवण्याबरोबर जीवनात शिस्त, संस्कार, आचार, विचार, देशभक्ती, राष्ट्रप्रेम, सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्ष यासह आदी नैतिक मूल्यांची जोपासना केल्यास जीवनात निश्चित यश मिळते. यावेळी या कार्यक्रमाला बाबासाहेब गोंटे, समर्थ इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक खांडेभराड सर, मुख्याध्यापक सोळुंके सर, पत्रकार माऊली दोबाले, पत्रकार बंडु शिंगटे, व शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


71
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!