श्रीरामपूर प्रतिनिधी : सुनिल वाघमारे. श्रीरामपूर (५ ऑक्टोबर):येथील शालेय विद्यार्थ्यांच्या शंभुक वसतिगृहामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. राज्यात आणि देशामध्ये सध्या सर्वत्र जाणीवपूर्वक जी जातीय तेढ (communal tension) निर्माण करून जनतेमध्ये वाद वाढवण्याचे षडयंत्र चालू आहे, त्या गंभीर विषयावर या बैठकीत मार्गदर्शनपर चर्चा करण्यात आली. या बैठकीत विद्रोही चळवळीची भूमिका आणि भविष्यातील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्यसचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. डॉ. घिगे यांनी यावेळी बोलताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीची नेमकी भूमिका, तिने आत्तापर्यंत केलेले आंदोलने आणि त्यातून समाजात साधलेला सकारात्मक परिणाम यावर विस्तृत विचार मांडले.यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सलीम शेख, विद्रोहीचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवेसर, वंचित बहुजन आघाडीचे सुनिल वाघमारे, संतोष त्रिभुवन, शाहीर भीमराव कदम, आणि डॉ. संजय दुशिंग यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहन केले.या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी ॲड. अमोल सोणवने, ॲड. अण्णासाहेब मोहन, ॲड. ज्ञानेश्वर वानखेडे, मातृ पितृ छाया प्रतिष्ठानचे उत्तमराव शेलार, योगेश धीवर, रविन्द्र गायकवाड, दिगंबर सुर्यवंशी, वसंत पवार, बाबासाहेब पवार, विजय जगताप, भारत शिंगे, आकाश पंडित, सतिश लोंढे, गोरख आढाव, विशाल गायकवाड, कृष्णा सारबोळ, इरहान हसन शेख, इम्तीयाज पठाण, सिराज शेख, संजय हिवराळे, भगवान खरात, विमल मोरे, छाया दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीतून सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर गंभीरपणे विचारमंथन करून चळवळीच्या पुढील कार्याची दिशा ठरवण्यात आली.













