केज/प्रतिनिधी
पुरोगामी पत्रकार संघाचे तेलंगणा राज्याचे अध्यक्ष गजाननजी बीडकर हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.या दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवार,दिनांक ८ जून रोजी केज येथील पतंजली औषधालय येथे पुरोगामी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आणि स्थानिक पत्रकारांशी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला.यावेळी बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी गजानन बीडकर यांच्या सोबत पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव गौरव बीडकर,माधुरीताई बीडकर आणि गिरीश बीडकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सत्कार
या सदिच्छा भेटीदरम्यान पुरोगामी पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष रंजीत घाडगे,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल वैरागे,ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील, पत्रकार धनंजय कुलकर्णी,पत्रकार मुब्बशीर खतीब,रोटरी क्लब ऑफ केजचे माजी तालुकाध्यक्ष श्रीराम शेटे, पतंजली औषधालयाचे संचालक शिवराज मुसळे तसेच प्रल्हाद देव, पत्रकार लक्ष्मीकांत लासिनकर यासह उपस्थित इतर मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तेलंगणा राज्याध्यक्षांचे व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार केला.
पत्रकारितेतील विविध विषयांवर चर्चा
या बैठकीत पत्रकारिता क्षेत्रातील सद्यस्थिती, पत्रकारांच्या विविध समस्या संघटनात्मक बांधणी,तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.पत्रकारांमध्ये एकजूट असणे अत्यंत आवश्यक आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे श्री.गजानन बीडकर(राज्याध्यक्ष, पुरोगामी पत्रकार संघ, तेलंगणा) यांनी सांगितले
या स्वागत समारंभाला बीड जिल्ह्यातील आणि केज तालुक्यातील अनेक पत्रकार,विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राज्याध्यक्षांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकार बांधवांचे आभार मानण्यात आले.












