बीड: उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या ‘युवक सहभाग आणि जल व्यवस्थापन (Youth Engagement and Water Stewardship)’ अभियानांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन बीड या संस्थेने ‘राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक उत्कृष्ट ग्रीन क्लब’ हा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील निवडक १३ जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पाण्याची बचत यावर लक्ष केंद्रित करत हे अभियान राबविण्यात आले होते. मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते वितरण शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ग्रीन क्लबच्या कार्याचे मूल्यांकन करून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी सीओईपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजित समारंभात मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. बीड तंत्रनिकेतनची तिहेरी यशोगाथा. शासकीय तंत्रनिकेतन बीडने केवळ राज्यस्तरावरच नव्हे, तर जिल्हास्तरावरही आपले वर्चस्व सिद्ध केले. संस्थेने प्राप्त केलेले पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत: राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक: उत्कृष्ट ग्रीन क्लब, जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार: उत्कृष्ट ग्रीन क्लब, जिल्हास्तरीय तृतीय पुरस्कार: बेस्ट शॉर्ट रील व्हिडीओ, व्यक्तिगत योगदानाचा गौरव ,संस्थेच्या या यशात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले: श्रीमती वावरे अमृता उद्धव (अधिव्याख्याता, यंत्र अभियांत्रिकी विभाग, बीड जिल्हा समन्वयक) यांना ‘उत्कृष्ट ग्रीन क्लब फॅकल्टी कॉरडीनेटर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तृप्ती क्षीरसागर (विद्यार्थिनी, संगणक अभियांत्रिकी विभाग) हिला जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोस्टर प्रेसेंटेशन द्वितीय पारितोषिक मिळाले. ग्रीन क्लब संस्था समन्वयक प्रा. डी. बी. करवर यांनाही सन्मानित करण्यात आले.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. किरण लाढाने यांनी संस्थेचे प्राचार्य डॉ. ए. के. वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे. शासकीय तंत्रनिकेतन बीडने जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या सामाजिक कार्यात नेतृत्व सिद्ध करून एक आदर्श निर्माण केला आहे.












