पोलिस प्रशासन न्यूज.

मनुवाद्यांकडून उच्चशिक्षित युवकांना संपवले; सुजात आंबेडकर यांचा आक्रोश, आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार


अकोला प्रतिनिधी:= महाराष्ट्र: वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित भव्य धम्म मेळाव्यात अत्यंत आक्रमक भूमिका मांडत आरक्षण आणि दलित, वंचित, आदिवासी समाजातील युवकांच्या हत्येच्या प्रश्नावर सडेतोड भाष्य केले.     “आरक्षणासाठी ‘एकला चलो रे चा निर्धार” सुजात आंबेडकर यांनी यावेळी देशातील आरक्षण वाचवण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे ठामपणे सांगितले. “कोणी सोबत असले तरी लढेल, कोणी सोबत नसले तरी लढत राहील!” अशा शब्दांत त्यांनी आपला अखंड आणि अटळ निर्धार व्यक्त केला. ​’मनुवाद्यांकडून उच्चशिक्षित युवकांची हत्या’ असल्याचा गंभीर आरोप.भाषणादरम्यान सुजात आंबेडकर यांनी थेट मनुवादी आणि जातीयवादी लोकांवर गंभीर आरोप करत म्हटले की, गेल्या 10 वर्षांत दलित, वंचित, आदिवासी समाजातील अनेक उच्चशिक्षित, हुशार युवकांचा जीव येथील जातीयवादी लोकांनी घेतला. या युवकांची प्रगती मनुवाद्यांच्या डोळ्यात खुपत होती, त्यामुळे त्यांची योजनाबद्ध हत्या करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले. या हत्येच्या घटनांची यादी देताना त्यांनी खैरलांजी हत्याकांडातील पीडित भोतमांगे कुटुंब, तसेच शहीद डॉ. रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी, विराज जगताप, नितीन आगे, अरविंद बनसोड, अक्षय भालेराव, आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा विशेष उल्लेख केला. मनुवाद्यांनी अनेकांचा जीव घेतला, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला मेळाव्यात उपस्थित असलेल्या जनसमुदायाने जोराचा पाठिंबा देत घोषणाबाजी केली.


57
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!