पोलिस प्रशासन न्यूज.

महिला सरपंच पतीला सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध अॕट्रॉसिटीचा गून्हा दाखल


केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील अनुसूचित जातीच्या महिला सरपंच प्रेरणा काळे यांचे पती दीपक काळे यांना गावातीलच एकाने सोशल मीडियावर अश्लील आणि जाती वाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध केज पोलिसात अॕट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील अनुसूचित जातीच्या महिला सरपंच प्रेरणा काळे यांचे पती दीपक रामभाऊ काळे आणि बंडू नारायण चौरे हे दोघे वॉट्सअप च्या सन २०२२ -२३ इलेक्शन टीम या नावाच्या वाॅटसअप ग्रुपमध्ये सहभागी आहेत. या ग्रुपवर बंडू चौरे याने दीपक काळे यांना अनेकदा अश्लील भाषेत शिवीगाळ केली.त्याच बरोबर जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यामूळे बुधवार,दि.११ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री दीपक काळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून बंडू चौरे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.


77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!