औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर);= येथील ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यात सहभागी झालेल्या अनुयायांनी बुद्ध विहाराच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आपल्या एकजुटीचा आणि निर्धाराचा पुनरुच्चार केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणूनॲड.प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित करताना गेल्या वर्षी बुद्ध विहाराला जाणूनबुजून अतिक्रमण ठरवून पाडण्याचा डाव कशा प्रकारे सर्वांनी मिळून हाणून पाडला होता, याची आठवण करून दिली. ही ऐतिहासिक एकजुटता यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ‘हिंमत आणि चारित्र्या’च्या बळावर प्रत्येक लढा जिंकू शकतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीचा आधार घेत, हिंमत (धैर्य) आणि चारित्र्य (नैतिकता) या दोन मूल्यांचे महत्त्व विषद केले. “कुठलेही यश मिळवायचे असेल किंवा कोणताही लढा यशस्वी करायचा असेल, तर त्यासाठी हिंमत आणि चारित्र्य लागते. या दोन गोष्टींच्या बळावरच आपण कुठलाही लढा यशस्वी करू शकतो,” असे स्पष्ट करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दोन गोष्टींच्या बळावर समाजाला गुलामगिरीतून मुक्त केले, याकडे लक्ष वेधण्यात आले.वंचित बहुजन आघाडीला साथ देऊन लेणीचे रक्षण करा.मेळाव्याच्या समारोपात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना एकजुटीची ही ताकद वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे अशीच कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. ही राजकीय ताकद कायम ठेवल्यास बुद्ध लेणीला कोणीही हात लावू शकणार नाही आणि लेणीचे संरक्षण अधिक भक्कम होईल, असा आत्मविश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.ऐतिहासिक बुद्ध लेणीचे पावित्र्य आणि अस्तित्व अबाधित राखण्यासाठी सामाजिक व राजकीय एकजुटता आवश्यक आहे, हा स्पष्ट संदेश या धम्मचक्र प्रवर्तन मेळाव्यातून देण्यात आला.













