पोलिस प्रशासन न्यूज.

७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बीडमध्ये २० ऑक्टोबर रोजी ७ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद; नियोजन बैठक उत्साहात संपन्न


प्रतिनिधी / बीड:

ऐतिहासिक ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून महाविहार धम्मभूमी, शिवणी (ता. जि. बीड) येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी भव्य अशा ‘७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या पूर्वतयारी व रूपरेषेबाबत चर्चा करण्यासाठी तुळशी आयटी कॉलेज, बीड येथे नुकतीच महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली.

​सदर बैठक पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी परिषदेचे नियोजन, देशभरातून येणाऱ्या उपासक-उपासिकांची व्यवस्था, परिसंवाद आणि धम्मप्रचाराची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.

​या नियोजन बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून पूज्य भिक्खू धम्मशील थेरो, प्रा. प्रदीप रोडे तसेच पी. व्ही. बनसोडे सर उपस्थित होते. यांच्यासह ‘प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, बीड’चे पदाधिकारी, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होत्या.

​सदर परिषद शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक स्वरूपात यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरांतून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी संयोजकांच्या वतीने करण्यात आले.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!