रांजणगावदेवी, गेवराई, अंतरवाली व नारायणवाडी येथे वंचित बहुजन आघाडी नाम फलकांची स्थापना
अहमदनगर प्रतिनिधी : सुनिल वाघमारे
नेवासा : दिनांक १४ सप्टेंबर रोजी नेवासा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत रांजणगावदेवी, गेवराई, अंतरवाली आणि नारायणवाडी या चार गावांमध्ये वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नेवासा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, युवा आघाडीचे पदाधिकारी तसेच महिला आघाडीच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने या शाखा उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष संतोषजी चोळके, युवा जिल्हाध्यक्ष प्रवीणभाऊ आल्हाट, युवा जिल्हा महासचिव सुनिलभाऊ वाघमारे, जिल्हाप्रवक्ते मा. अनिलभाऊ जाधव, युवा जिल्हा उपाध्यक्ष योगेशभाऊ गायकवाड, युवा जिल्हा उपाध्यक्ष बबलूभाऊ पगारे, तालुकाध्यक्ष मा. पोपट सरोदे, युवा तालुकाध्यक्ष मा. आकाश इंगळे, ता. संघटक मा. नितीन गोर्डे, गटप्रमुख जगदीश आदमने, शिर्डी शहराध्यक्ष बाळूभाऊ गायकवाड यांच्यासह फकीरा गायकवाड, राहुल ठोंबरे, सचिन हिवाळे, सचिन साठे, सुनील हिवाळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चारही शाखांचे उद्घाटन उत्कर्षाताई रुपवते, संतोषजी चोळके, प्रवीणभाऊ आल्हाट आणि सुनिलभाऊ वाघमारे यांच्या हस्ते तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शाखा उद्घाटनाच्या वेळी संबंधित गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शाखांचे उद्घाटन करण्यात आले. गावकऱ्यांसह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांसाठी भोजनदानाचेही आयोजन करण्यात आले होते.
या शाखांच्या माध्यमातून गावागावांतील वंचित, बहुजन, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी तसेच सामाजिक न्यायाच्या चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी काम करण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
नेवासा तालुक्यात संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने चार गावांमध्ये झालेल्या या शाखा उद्घाटनामुळे आगामी काळात गावपातळीवर पक्षाचे संघटन अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे.












