पोलिस प्रशासन न्यूज.

“वाचाल तर वाचाल” तर्फे शिक्षक दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा..


बीड ( प्रतिनिधी ) – माता पिता हे बालकांचे पहिले गुरु असतात तर विद्यार्थी दशेत शिक्षक हाच सर्वश्रेष्ठ व विद्यार्थ्यांच्या जीवनाला घडविणारा खरा शिल्पकार आसतो शिक्षकाकडून मिळालेले ज्ञानदान विद्यार्थ्यांना यशाच्या उच्च शिखरावर घेऊन जाणारे असते. तेव्हा गुरुजना प्रति कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांचा समाजात नेहमी सन्मान राखणे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे असे भावपूर्ण उद्गार सेवानिवृत्त पी.आय. सुरेश साबळे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले.

महामानव अभिवादन ग्रुप संचलित 05 मोफत शिकवणी वर्गाच्या शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून वाचल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय बीड तर्फे शिक्षक दिन विविध उपक्रमाचे आयोजन करून प्रकाश आंबेडकर नगर येथील मोफत शिकवणी वर्गात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सेवानिवृत्त पीआय सुरेश साबळे अध्यक्षपदी तर सेवानिवृत्त शिक्षक सूर्यकांत जोगदंड (कास्ट्राईब शिक्षक संघटन) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. विचार मंचावर सेवानिवृत्त सीईओ पि.व्ही बनसोडे, महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले,समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले, सेवानिवृत्त ए. एस.आय तानाजी शिनगारे, सेवानिवृत्त ए. एस. आय अशोक सोनवणे, सेवानिवृत्त ए. एस.आय अशोक ठोकळ, अँड.तेजस वडमारे काशिनाथ वाघमारे,बि.डी.तांगडे, वंदना वाघमारे, डॉ.जगदीश वाघमारे, डि.एम. राऊत व प्रा.अशोक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनअँड.तेजस वडमारे यांनी केले तर प्रस्ताविक डी.जी.वानखेडे यांनी करून महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचल फिरते मोफत वाचनालय गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती करिता व स्पर्धेत टिकून राहण्याकरिता करीत असलेल्या अनेक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली व पारदर्शक कार्यामुळे समाज बांधवाकडून मिळत असलेल्या दानाबद्दल माहिती दिली.

सर्व प्रथम आदर्शांचे पुष्प दीप धुपाने पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मोफत शिकवणी वर्गाचे शिक्षक आयु.रवींद्र टेकाळे आयु.रिंकल टेकाळे, आयु विशाखा वाघमारे यांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाचाल तर वाचाल तर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील गुणवंतांचा तसेच मासिक घटक चाचणी परीक्षेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य (वही पेन) व महापुरुषांची जीवन चरित्रे पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे,विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची स्पर्धा असावी म्हणून असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. प्रमुख पाहुणे सूर्यकांत जोगदंड विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की “खाऊजा” धोरणामुळे दीनदलित,वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या शिक्षण सुविधांसाठी “पे बॅक टू सोसायटी” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोलाचा उपदेश लक्षात घेऊन महामानव अभिवादन ग्रुप बीड व वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय कार्य करीत आहे, असे प्रतिपादन जोगदंड यांनी व्यक्त केले. बोद्धाचार्य कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी विपश्यना शिबिर करणे म्हणजे स्वतःला समजून घेणे व माणूस बनून , माणसाने माणसासारखे माणसाशी कसे वागावे हे समजावून घेण्याकरिता प्रत्येकाने विपश्यना शिबिर केले पाहिजे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या लेकी कु. माही लोखंडे वर्ग पाचवा व अमृता चौगुले वर्ग सातवा या विद्यार्थिनींनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घटनेनुसार अपेक्षित असलेला भारत देशात राजकीय सामाजिक न्याय, संस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगती करिता तसेच संधीची समानता कशी मिळेल याबद्दल आपल्या खड्या व सुस्पष्ट ओघवत्या आवाजात वक्तृत्व केले तेव्हा या दोन्हीही विद्यार्थिनींचे उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले व जी.एम भोले यानी रोख बक्षीस तर वाचाल तर वाचाल तर्फे डॉ.एपीजे अब्दुल कलाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता जिजाऊ सर्वच महापुरुषांच्या जीवन चरित्राची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली.

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचनालयाच्या 1 ल्या केंद्रातील प्रकाश आंबेडकर नगर करिता 9 व्या फेरीतील 51 पुस्तकांचा संच वितरित करण्याकरता शिक्षिका विशाखा वाघमारे यांना वाचनालया तर्फे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द केला. प्रा.डॉ. नामदेव शिनगारे यांनी 23 पुस्तकांचा संच वाचनालयाला भेट दिला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. जगदीश वाघमारे यांनी व्यक्त केले कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य पालक विद्यार्थी उपस्थित होते सरणातयणे व विद्यार्थ्यांना अल्पेपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!