पोलिस प्रशासन न्यूज.

गल्हाटी प्रकल्प : घाटगे साहेबांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा


रामकिसन अवधूत ( जालना प्रतिनिधी ) :अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मा. श्री. सतीश घाटगे साहेबांनी भेट दिली. गेल्या २५ ते ३० वर्षांपासूनच्या सुरू असलेल्या या न्याय्य व शेतकरी हिताच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देत या लढ्यात पूर्ण ताकतीने शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

दाढेगावसह परिसरातील दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी डाव्या कालव्याचे पाणी गल्हाटी प्रकल्पात आलेच पाहिजे, ही आपली भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना राबवून अनेक प्रकल्पांना संजीवनी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर वडीगोद्री येथे उपसा सिंचन योजना मंजूर करून गल्हाटी प्रकल्पात पाणी आणणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करावा, असे आवाहन घाटगे साहेबांनी यावेळी केले.

यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!