पोलिस प्रशासन न्यूज.

दिल्ली येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज केज बंद वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन


केज:प्रतिनिधी

(प्रतिनिधी)

नवी दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार दि. २३ जुलै २०२६ गुरुवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वंचित बहुजन आघाडी, केज तालुक्याच्या वतीने केज शहर शांततेत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, केजच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध नोंदविणे, लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे तसेच संविधान आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच दि. २३ जुलै रोजी होणाऱ्या बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व्यवस्था करावी, अशी विनंती तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या बंदमध्ये व्यापारी, नागरिक, सामाजिक संघटना तसेच सर्व आंबेडकरी अनुयायांनी शांततेच्या मार्गाने सहभागी होऊन केज बंद यशस्वी करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी, केज यांच्या वतीने करण्यात आले आहे.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!