पोलिस प्रशासन न्यूज.

केज: सोशल मीडियावरून 150 हून अधिक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आरोपीला अटक


केज, प्रतिनीधी (लाईव्ह अशोका टाईम्स न्यूज) := दि. 5 जून 2026 – पोलीस ठाणे धारूर येथील गु.र.नं. 198/2026 मधील फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल गिताजी गिरी याला केज पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सोशल मीडियावरून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक व शारीरिक फसवणूक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

*नेमकं प्रकरण काय?*

दि. 17 मे 2026 रोजी 03:53 वाजता धारूर पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गु.र.नं. 198/2026, कलम 69, 115(2), 352, 3(5) BNS 2023 सह अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3(2)(va), 3(1)(w)(i)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

*अटक आणि तपास*

पोलीस अधीक्षक, बीड व अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी केज यांच्या पथकाने तपास केला. सहायक पोलीस अधीक्षक श्री. वेंकटराम (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखाली पोह/996 डापकर, पोहे/1384 चोपने, पोह/390 इनामदार, पोअं/1647 इनामदार, चापोह/1340 माने व चापोअं/361 करांडे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेतला.

आरोपी सुनिल गिताजी गिरी, रा. जमालपूर ता. औसा जि. लातूर, हल्ली मु. इंद्रायणी नगर लातूर याला दि. 4 एप्रिल 2026 रोजी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करून पीसीआर घेण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

*गुन्ह्याची पद्धत*

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

– *150 हून अधिक महिला टार्गेट*: आरोपी व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक व स्नॅपचॅटच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त महिलांना मेसेज करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होता.

– *शारीरिक व आर्थिक फसवणूक*: तक्रारदार महिलेला नऊ महिने लातूर व पुणे येथे सोबत ठेवून तिच्याशी सतत शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून 40 हजार रुपये रोख व 2/3 तोळे सोने घेऊन खर्च केले. पैसे संपल्यानंतर महिलेस त्रास देऊन हाकलून दिले.

*पोलिसांचे आवाहन*

सदर आरोपी हा सोशल मीडियाचा वापर करून महिला व मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात सराईत आहे. त्यामुळे त्याच्यापासून व इतर संशयित सोशल मीडिया आयडींपासून सर्वांनी सावध राहावे. कोणत्याही भूलथापांना व प्रलोभनांना बळी पडू नये व अशा प्रकारचे फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज यांनी केले आहे.

*पथकाचे  अभिनंदन*

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक श्री. वेंकटराम व त्यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे.


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!