केज/प्रतिनिधी
पंचायत समिती,केज कार्यालयातील अधिकारी अभिमान राठोड यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते यांना वेळोवेळी टाळाटाळ केलेली आहे, सुनावणी घेण्यासाठी टाळाटाळ करणे सुनावणीचे पत्र न काढणे,पत्र न काढता कॉल करून सांगणे की तुमची सुनावणी आहे तुम्ही सुनावणीसाठी हजर राहा,आणि स्वतः अपील अधिकारी अभिमान राठोड गैरहजर राहतात याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून दिनांक १९ मे २०२६ रोजी ठीक दहा वाजून दोन मिनिटांचा फोटो गुगलमॅप लोकेशन सह पाठवलेला आहे. लोकांच्या वेळेची,पैशाची नासधूस करणे राठोड यांच्या आवडीचा खेळ आहे.नागरिकांच्या भावनांची खेळणे, जबाबदारी पासून पळून जाणे,ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या, चोराच्या पाठीशी अप्रत्यक्ष उभे राहणे? सदर घटनेची रीतसर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते श्री.अक्षय गोटेगावकर यांनी विभागीय माहितीआयुक्त व मुख्य आयुक्त पांडे साहेब यांच्याकडेपत्राद्वारे केली आहे.केज पंचायत समिती कार्यालयातील बेलगाम मुजोर अपिलीय अधिकारी अभिमान राठोड यांच्यावर सक्त कारवाई होणे गरजेचे आहे.कारवाईची नोंद राठोड यांच्या सेवा पुस्तिकात व्हावी अशी मागणी सचिवांकडे केली आहे असे त्यांनी सांगितले आहे.












