पोलिस प्रशासन न्यूज.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमातून सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा; हजारोंचा सहभाग


श्रीरामपूर.प्रतिनिधी:सुनील वाघमारे :=

क्रांतीसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, श्रीरामपूर यांच्या वतीने आयोजित २० एप्रिल २०२६ रोजी भव्य नवयान महा जलसा, सामाजिक गौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता, आंबेडकरी विचारांवर आधारित ठाम राजकीय भूमिका मांडणारा प्रभावी मंच ठरला. या कार्यक्रमातून वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत, सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांवर ठाम राहण्याचे आवाहन केले. “सत्ता ही अंतिम ध्येय नसून परिवर्तन हाच खरा उद्देश आहे,” असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य उपाध्यक्षा दिशाताई शेख, जिल्हा महासचिव मधुकर साळवे, जिल्हा सचिव सुनील ब्राम्हने, युवा जिल्हामहासचिव सुनील वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष सुहासभाऊ राठोड, युवा जिल्हाअध्यक्ष प्रवीण आल्हाट, ओमाभैय्या त्रिभुवन, महेश पाखरे, दिपक कसबे, राहुरी तालुका महासचिव पंकज पडघलमल, नेवासा महासचिव गणपत मोरे, राम मगरे संतोष मोरे, योगेश घोडके, चेतन गायकवाड, तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने मा. जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, बोरुडे सर, सी. एस. बनकर , गौतम पगारे प्रकाश सावंतसाहेब, नाना पंडित, गुलाब लोखंडे, तसेच विद्रोही चळवळीचे जिल्हाध्यक्ष अशोक दिवे, ॲड अमोल सोनवणे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमातून शाहीर सचिन माळी आणि शीतल साठे यांनी जलस्याच्या माध्यमातून सर्वांना वंचित समाजाच्या स्वाभिमानासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.

“औरंगाबादvba नगरसेविका, पती प्रसिद्ध गायक मेघानंद जाधव” यांनीही घेतला कार्यक्रमाचा आस्वाद.

यावेळी धार्मिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. भंते मोगलायन फादर आनंद बोधक, सुनील वाघमारे, हेमंत त्रिभुवन सर, सविता गायकवाड, वैशाली ताई अहिरे मा. नायब तहसीलदार चारुशीला सोनवणे, डॉ शैलजा साबळे, आदींचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजासाठी योगदान देणाऱ्यांना राजकीय बळ देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमातील नवयान महा जलसा आणि भीमगीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. शाहीरांच्या जोशपूर्ण गीतांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर युवकांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली, ज्यामुळे आगामी राजकीय घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडी अधिक सक्रिय होण्याचे संकेत मिळाले.

कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. गौतम सिंधू विक्रम चित्ते (तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, श्रीरामपूर) यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सुनिलभाऊ वाघमारे, ओम त्रिभुवन, सुहास भाऊ राठोड अण्णासाहेब मोहन, संतोष त्रिभुवन, रेखा ताई बोरुडे वैशाली ताई अहिरे यांनी विशेष प्रयत्न केले.

या कार्यक्रमातून वंचित बहुजन आघाडीने श्रीरामपूरात आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. समाजातील वंचित घटकांना एकत्र आणून राजकीय पर्याय उभा करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

शेवटी आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार मानले. श्रीरामपूर शहरात या कार्यक्रमाची राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.


*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

77
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

*वडी लासुरा (ता. अंबड) येथे तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या मूर्तींचे प्रतिष्ठापना व अनावरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचे भव्य आयोजन.*

error: Content is protected !!