श्रीरामपूर. (सुनील वाघमारे.प्रतिनीधी) अहमदनगर १४ एप्रिल
(श्रीरामपूर तालुका) फुले-आंबेडकरनगर येथे घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम महामानवास सुनिलभाऊ वाघमारे तसेच योगेशभाऊ घोडके यांचे हस्ते पुष्प वाहून माणवंदना देण्यात आली. जयंती निमित्त हजारो भीम अनुयायांना शाही शरबतचे वाटप करण्यात आले.
या कामी उसमा शेख, युवाआघाडीचे तालुकाध्यक्ष विलास अहिरे, शाखाध्यक्ष बाळू खरात, राहुल गायकवाड, तेजस कटारणवरे, यांचे मोलाचे योगदान होते.
कार्यक्रमास चेतन गायकवाड, रवि शेलार, सिद्धार्थ त्रिभुवन, रविराज शिनगारे, अमोल शेजवळ, बाळासाहेब रंधे, गोपी दुशिंग, दत्तू खरात, किरण उबाळे, प्रतिक भाटे, विश्वास पारखे, दिलिप पारखे, आदींचे सहकार्य लाभले.
सदर सरबत वाटपाचे आयोजन वंचित बहुजन युवाआघाडी, फुले-आंबेडकर मित्रमंडळ यांनी केले होते..












