प्रतिनिधी (रामकिसन अवधूत)जालना: 
भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंठा बायपास रोड अंबड चौफुली जालना येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला.
२ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. तसेच नरेंद्र मोदी यांचा जेफ्री एपस्टीनशी काय संबंध आहे, अमेरिकेसोबत देशविरोधी करार का केले जात आहेत, फ्रान्ससोबत राफेल करार का करण्यात आला, तसेच भारताची विदेश नीती अमेरिकेच्या दबावाखाली ठरवली जात आहे का, असे प्रश्न बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केले होते.
या प्रश्नांची उत्तरे अद्याप नरेंद्र मोदी यांनी दिलेली नाहीत. दरम्यान, मोदींना प्रश्न विचारल्यामुळे भाजपचे अमर साबळे यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालना येथे आंदोलन करून साबळे यांच्या प्रतिमेची होळी करून दहन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके जिल्हा उपाध्यक्ष अकबर इनामदार , जिल्हा संघटक राजेंद्र खरात, महीला जिल्हाध्यक्षा रमाताई होर्शिळ, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने , तालुकाध्यक्ष भानुदास साळवे विलास नरवडे , दिलीप मगर संजय आदमाने सुशीलाताई गायकवाड उप अध्यक्ष महिला आघाडी, लिलाताई काकडे, गणेश खरात, शत्रुघ्न कोळी,शरद वाघमारे,अमोल लोखंडे, सत्यपाल गायकवाड, बुध्दाजी भोसले कपिली सूर्यनारायण, शत्रूधन कोळी, दत्ता आदमाने, पांडुरंग मगर, सोनाली चव्हान, बिरजू भोसले, आलानबाई भोसले, सुनील चव्हाण, अर्केस्ट्रा बाई चव्हान, लक्ष्मी चव्हान, धनराज गिरी,हनुमंत मोरे ,परमेश्वर खरात, संजय सरोदे, माणिक पाढमुख, रविदास पाडमुख, पंडित पाडमुख, शरद वाघमारे प्रकाश म्हस्के यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











