पोलिस प्रशासन न्यूज.

नांदूरघाट येथील जिल्हा परिषदची शाळा वाचवा,


प्रजासत्ताक दिनी अमोल जाधव यांनी शाळेतच केले विषप्राशन

केज/प्रतिनिधी : केज तालुक्यातील नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्गखोल्या मंजूर न झाल्याच्या व शाळा बांधकामातील कथित गैरव्यवहारा प्रकरणी कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ नांदूरघाट येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी प्रजासत्ताक दिनी सोमवारी शाळेतच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळा वाचवण्या साठी,व ग्रामीणभागातील गोरगरिबांच्या मुलांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळाव्यात.शाळा बांधकामातील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल जाधव हे सातत्याने शासन व प्रशासनस्तरावर पाठपुरावा,आंदोलने व न्यायालयीन प्रयत्न करत आहेत.परंतु या प्रकरणी वारंवार निवेदने देऊनही शाळेसाठी आवश्यक त्या नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आल्या नाहीत. प्रशासनाकडून अखेर न्याय न मिळाल्यामुळे सोमवारी दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येचा प्रयत्न केला केला.यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेपकेल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,व नांदुरघाट येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी त्वरित नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री,विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या मार्फत केली आहे.

जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी खाजगी शिक्षण संस्थाचालकांशी संगनमत करून जिल्हा परिषदेची शाळा डबघाईस आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शासन,प्रशासनासाठी ही लाजिरवाणी बाब असून, खाजगी संस्थानिकांशी संधान बांधून सरकारी शाळा बंद पाडण्याचे हे षडयंत्र आहे.अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख,बीडजिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी बोलताना दिली.


गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

85
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

गायरानधारकांच्या शेतीवर गदा आणणारे प्रकल्प रद्द करा; वडवणीत तहसीलदारांना निवेदन ​उपळीतील १८ के.व्ही. महावितरण व पुसरा एमआयडीसी प्रकल्पाला गायरानधारकांचा तीव्र विरोध; पीक पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

error: Content is protected !!