पोलिस प्रशासन न्यूज.

सुखापूरी येथे वार्षिक स्नेहमिलनानिमित्त रंगला सांस्कृतिक कार्यक्रम


सुखापूरी,रामकिसन अवधूत (प्रतिनिधी) :

अंबड तालुक्यातील सुखापूरी येथील समर्थ शैक्षणिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित समर्थ इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहमिलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन सुखापूरीचे माजी उपसरपंच मा. लहुराव राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन सुखापूरी येथील रंभादेवी मंदिर परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे माजी उपसभापती मा. रईस भाई बागवान हे होते.यावेळी सुखापूरीचे सरपंच मा. भगवान भाऊ राखुंडे, कुक्कडगावचे सरपंच मा. उद्धव गायकवाड, ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच तसेच परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सुखापूरीचे उपसरपंच नसीर बागवान, लखमापूरीचे सरपंच मा. ज्ञानेश्वर तारगे, उपसरपंच सुनील गाडे, प्रताप राखुंडे, अंकुश जीजा लहुटे, कल्याण शिंदे, लक्ष्मण शिंदे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.शाळेतील चिमुकल्या बालगोपाळांनी सादर केलेली विविध नृत्ये, सांस्कृतिक कार्यक्रम व कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी निरागसपणे सादर केलेल्या कला व अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे प्रभावी व उत्साही सूत्रसंचालन सचिन राठोड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई राखुंडे, सचिव सौ. गंगा सुरेश पाटील, सहसचिव डॉ. सुरेश पाटील, रामेश्वर राखुंडे तसेच शाळेचे शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.एकूणच हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा ठरला असून ग्रामस्थांसाठी आनंदाची पर्वणी ठरली.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!