अंबड,रामकिसनअवधूत (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीने देण्यात येणारा 2025-26 चा सामाजिक व पत्रकार क्षेत्रातील राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वडिगोद्री, अंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथील दैनिक सकाळ चे पत्रकार दिलीप दखणे यांना देण्यात आला आहे आहिल्यानगर येथे माऊली संकुल सभागृहात सोमवार ता.5 रोजी महाकालभक्त, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त मंहंत डॉ.श्रीकांतदास महाराज पुणे, सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पा. पावसे, एकनाथ ढाकणे, प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार, यादवराव पावसे, डॉ.शंकर अंदानी,सिने अभिनेत्री रूचिरा देसाई, डॉ.सुधा कंकारीया, अमोल शेवाळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत दखणे यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वडिगोद्री, अंतरवाली सराटी, या ग्रामीण भागात तब्बल पंचवीस वर्षापासून दिलीप दखणे हे पत्रकार म्हणून काम करत आहे ते अंतरवाली सराटी येथील ग्रा.प.चे विद्यमान सदस्य आहे. दैनिक अंजीठा,गावकरी, लोकपत्र, सकाळ या वर्त्तमान पत्रात त्यांनी काम केले.विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला, पत्रकारीता, कला,क्रिडा,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले, कृतिशील असलेले पत्रकार दिलीप दखणे यांची राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारा मिळाला आहे. त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, देऊन गौरविण्यात आले दखणे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच क्षेत्रात त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याऱ्या राज्यातील सरपंच, सामाजिक, शैक्षणिक,पत्रकार, आदीचा दरवर्षी गौरव करत आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये स्त्री जल्माचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी सरपंच यांनी पुढाकार घ्यावा हि चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सरपंच सेवा संघ प्रयत्न करत आहे असे बाबासाहेब पा.पावसे ,अध्यक्ष सरपंच सेवा संघ आहिल्यानगर यांनी या वेळी बोलतांना सांगितले तर सरपंच सेवा संघ हा राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मांन्यवरांचा गौरव करत आहे हि बाब आनंदाची आहे महाकाल संस्थानच्या माध्यमातून गोर गरीब जनतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहे,कुंभमेळा करीता राज्यातील भक्तांनी उपस्थित राहावे असे अवहान मंहत श्रीकांतदास धुमाळ ,पुणे यांनी केले आहे. दिलीप दखणे यांना राज्यस्तरीय पत्रकार वितरण करतांना महंत श्रीकांतदास धुमाळ, बाबासाहेब पावसे पाटील व इतर दिसत आहे.














