केज/प्रतिनिधी : लहुजी क्रांती मोर्चा, लसाकम व बीसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती मुक्ता साळवे यांच्या जयंती निमित्त आयोजित जाहीर परिसंवाद केज येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाला.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत लहुजी साळवे यांचे योगदान व परिणाम या विषयावर प्रा.विकास पाथ्रीकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी एच.पी.कांबळे सर होते.यावेळी सौ. शितलताई लांडगे यांना संघर्षनायिका राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड,अॕड. दीपक साठे,एस.एम. जोगदंड,दत्ता माने, सुनिल वैरागे,भास्कर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश पाटोळे यांनी केले तर आभार कांबळे सर यांनी मानले.नागरिक व तरुणांची मोठी उपस्थिती लाभलेल्या या परिसंवादातून फुले, सावित्री,मुक्ता व लहुजी साळवे यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.













