पोलिस प्रशासन न्यूज.

केजच्या शिक्षक कॉलनीतील समस्या आता सुटणार!


​१ कोटींच्या भव्य उद्यानाची घोषणा; ‘लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे’ चौकाच्या मंजुरीबद्दल मान्यवरांचा नागरी सत्कार

​केज/प्रतिनिधी:

केज शहरातील शिक्षक कॉलनी भागाचा प्रलंबित विकास आता गती घेणार आहे. या भागातील रस्ते, नाल्या आणि विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील, अशी ग्वाही नगर पंचायतचे गटनेते हारुणभाई इनामदार यांनी दिली. विशेष म्हणजे, या भागातील नागरिकांसाठी १ कोटी रुपये निधीतून एका भव्य उद्यानाचे काम महिनाभरात सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

​शिक्षक कॉलनी भागातील आंबेजोगाई-बीड हायवेवरील चौकास ‘लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक’ असे नाव देण्याचा ठराव नगर पंचायतने सर्वानुमते मंजूर केला. पत्रकार प्रकाश मुंडे व स्थानिक युवकांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला होता. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक कॉलनीतील नागरिकांनी नगर पंचायत पदाधिकाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता.

​विकासासाठी सत्ताधारी कटिबद्ध:

सत्काराला उत्तर देताना हारुणभाई इनामदार यांनी डीपी (DP) बसवण्यासह सर्व नागरी सुविधा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्षा डॉ. सौ. सिताताई बनसोड यांनी, “कॉलनीतील माता-भगिनींचे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे नमूद केले. नगरसेवक अझहर भाई इनामदार यांनीही या भागाच्या विकासात कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे सांगितले.

​नागरिकांची मोठी उपस्थिती:

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब केदार सर यांनी केले, तर आभार प्राध्यापक मुकुंद मुळे सर यांनी मानले. या सोहळ्याला एम.डी. घुले सर, चंदू चौरे, सोनू धस, महादेव जाधवर, नागरगोजे साहेब, तांबडे सर, प्रकाश मुंडे, खय्युम शेख, अमोल धस, अमोल घुले यांच्यासह शिक्षक कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!