जालना(संपादकीय प्रतिनीधी): आंबेडकर वाडी (निधोना) येथे एकदिवसीय धम्म संस्कार शिबिर उत्साहात; ५५ हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. आजच्या धावपळीच्या जीवनात तरुण पिढीला शील आणि नीतिमत्तेची शिकवण मिळावी, या उदात्त हेतूने जालना जिल्ह्यातील निधोना (आंबेडकर वाडी) येथे नुकतेच एकदिवसीय धम्म संस्कार शिबिर यशस्वीरित्या पार पडले. भिक्खू धम्मशील थेरो (बीड) आणि भिक्खू पय्यावर्धन (हिंगोली) या सुप्रसिद्ध भिक्खूंनी यावेळी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. उद्घाटनावेळी शिबिराचा उद्देश स्पष्ट.
हे शिबिर स्थानिक उपासिका यशोदाआई खरात यांच्या ‘यशोदीप निवास’ येथे खरात परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता निधोना येथील सरपंच यांच्या हस्ते दीप व धूप प्रज्वलित करून आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना भिक्खु धम्मशील थेरो यांनी स्पष्ट केले की, “तथागतांनी उपदेशिलेले पंचशील हे केवळ तत्त्वज्ञान नाही, तर सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. या तत्त्वाचे आचरण केल्यास मानवी जीवनात सकारात्मक बदल घडवून येतो आणि व्यक्ती सील-सदाचाराने आपले आयुष्य शुद्ध करू शकते.” विद्यार्थ्यांसाठी संस्काराची शिदोरी”सकाळ ९ ते सायंकाळ ६ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात ५५ ते ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिबिरादरम्यान मुलांना खालील महत्त्वाचे धडे देण्यात आले: बुद्ध वंदना व ध्यान साधना धम्म संस्कार व पाली भाषेचे प्राथमिक ज्ञान पंचशीलाचे मानवी जीवनातील अमूल्य महत्त्व आधुनिक पिढी नीतिमत्तेने जगावी आणि आपले भविष्य सुरक्षित करावे, यासाठी खरात परिवाराने हे स्तुत्य आयोजन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपासक कैलास जी खरात, शिल्पाताई खरात, रोहित खरात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने कठोर परिश्रम घेतले.













