बीड : आगामी बीड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. बीडमधील सामाजिक आणि कामगार क्षेत्रात विशेष ओळख असलेले, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख नसीरभाई यांनी अखेर नागरिकांच्या जोरदार मागणीला मान देत प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत.महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन,शेख खदीर भाई,जयंत वाघ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
” जनतेच्या मागणीवर शिक्कामोर्तब”
गेल्या काही दिवसांपासून प्रभाग ९ मधील स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग आणि विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन शेख नसीर यांच्याकडे निवडणुकीत उभे राहण्याची मागणी केली होती. बांधकाम कामगारांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी त्यांनी वेळोवेळी उचलून धरलेल्या प्रश्नांमुळे त्यांची प्रतिमा एक संघर्षशील आणि लोकाभिमुख नेता म्हणून तयार झाली आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीमुळे आज त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
लोकप्रियतेचे मूळ: सामाजिक कार्य
शेख नसीर यांनी बांधकाम मजुरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. रस्त्यांचे प्रश्न असोत, की पाण्याच्या समस्या – त्यांनी नेहमीच नागरिकांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या याच कामामुळे त्यांच्या उमेदवारीची मागणी केवळ औपचारिक नसून, जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे, असे बोलले जात आहे.
” प्रभाग ९ मध्ये मोठी चुरस”
शेख नसीर यांच्या प्रवेशामुळे प्रभाग ९ मधील निवडणूक आता एकतर्फी न राहता, अतिशय चुरशीची होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे इतर संभाव्य उमेदवारांना मोठी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून निवडणुकीचा माहोल चांगलाच तापल्याचे दिसत आहे.













