पोलिस प्रशासन न्यूज.

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे शिबिर कुक्कडगाव येथे ५ ऑक्टोबर रोजी


बीड (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे (SSD) एकदिवसीय शिबिर येत्या रविवार, दिनांक ५ ऑक्टोबर रोजी कुक्कडगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. कॅप्टन राजाभाऊ आठवले, मेजर जनरल समता सैनिक दल, बीड यांनी या शिबिराचे आयोजन केले असून, जास्तीत जास्त बौद्ध तरुण-तरुणी, महिला व पुरुषांनी यात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शिबिराची उद्दिष्ट्ये:शतकपूर्तीचा संकल्प: समता सैनिक दलाची स्थापना २० मार्च १९२७ रोजी महाडच्या सत्याग्रह दिनी झाली होती. २० मार्च २०२७ रोजी या संघटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याच अनुषंगाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी एक लाख समता सैनिक करण्याचा संकल्प केला आहे.​हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेबआंबेडकरांची चळवळ गतिमान करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिर सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालेल.प्रशिक्षक: शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून आदरणीय सुजाता प्रशांत वासनिक (कंपनी कमांडर) आणि आदरणीय प्रतिभा रणजीत वाघमारे (कंपनी कमांडर) या उपस्थित राहणार आहेत.​शिबिरासाठी येताना इच्छुकांनी दोन पासपोर्ट फोटो आणि आधार कार्ड झेरॉक्सची एक प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व शिबिरार्थींसाठी दुपारचे जेवण दिले जाईल, याची नोंद घ्यावी.कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी आसपासच्या खेड्यातील. सर्व बंधु-भगिनी,उपासक-उपासिकांनी या महत्त्वपूर्ण शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना गती द्यावी, अशी विनंती केली आहे.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!